पुणे : डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि युट्यूब पत्रकारितेची बदलती भूमिका लक्षात घेऊन, युट्यूब पत्रकार, डिजिटल पत्रकार, पारंपरिक पत्रकार तसेच पत्रकारितेत नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी एका विशेष एकदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा उद्या, शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पुण्याच्या प्रसिद्ध ‘रानडे इन्स्टिट्यूट, डेक्कन, शिवाजीनगर’ येथे पार पडणार आहे.
डिजिटल पत्रकारितेची नवी कौशल्ये आणि नवी दिशा आत्मसात करून ती प्रभावीपणे कशी वापरावीत, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांना अपडेट राहण्यासाठी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कार्यशाळेत सहभाग पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून, इच्छूक पत्रकार आणि नवोदित युवकांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नावनोंदणी व संपर्काची माहिती: कार्यशाळेत प्रवेश मिळवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपली नावनोंदणी निश्चित करावी:
- नीलिमा शिकारखाने: ९८९०५०८०९१
- व्हॉट्सॲप (WhatsApp): ९३५६८७३३३१






More Stories
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन कुलकर्णी यांची निवड
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे मिळाला काशीकापडी समाजाला न्याय..!
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज