November 13, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे मिळाला काशीकापडी समाजाला न्याय..!

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर शहर (प्रतिनिधी-अर्चना थोरात)- पंढरपूर शहरातील तुळशीमाळ बनवणाऱ्या काशीकापडी समाजाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी समाज मंदिराला जागा उपलब्ध करून दिली आहे. याबाबात पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर येथे प्रशासकीय ठराव मंजूर झाला आहे. पंढरपूरातील वारी काळात काशीकापडी समाज तुळशीमाळ विक्री करत असतो. कार्तिक वारीमुळे आनंद उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे आज काशीकापडी समाजातील समाज बांधव एकत्रीत येवून एकमेकांना साखर वाटप करून फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

काशीकापडी समाजाला समाज मंदिर मिळण्यासाठी आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी चेअरमन भगिरथ भालके, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शिवसेना युवासेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणार्‍या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळखला जाणारा समाज म्हणजे काशीकापडी समाज. पंढरपुरातील काशीकापडी गल्ली, अनिल नगर या भागासह पंढरीच्या विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या वारकर्‍यांची सेवा निस्सिम भावनेने करणार्‍या या समाजासाठी अद्याप पर्यंत पंढरीत कुठेही हक्काचे समाजमंदिर नव्हते, याची मागणी बर्‍याच वर्षांपासुन प्रलंबित होती.
अखेर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काशीकापडी समाजाची दखल घेऊन समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली.

यावेळी यावेळी काशी कापडी समाजाचे पंढरपूर अध्यक्ष औदुंबर गंगेकर, माजी अध्यक्ष आबासाहेब कापसे, माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, समाजसेवक श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे, दत्तात्रय वाडेकर, अशोक उपळकर, श्रीकांत वाडेकर,

भारत टमटम, विनायक पिंगळे, सुनील इंदापूरकर, दीपक पालकर, नितीन पानकर, ज्ञानप्रसाद शेटे, कैलास कापसे, संजय पालकर, संतोष वाडेकर, शुभम उपळकर, गौरव वाडेकर, अमोल टमटम, पांडुरंग भिंगारे आदेश भिंगारे, सागर उपळकर, नितिन भिंगारे, रविंद्र टमटम, साहिल भिंगारे आदीसह काशीकापडी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!