श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यवाहीवर संचालक मंडळ व चेअरमन अभिजीत पाटील यांनी १ महिन्यासाठी स्थगिती मिळाली आहे.

मागील जुन्या संचालक मंडळाच्या काळातील ही सर्व थकीत कर्जाच्या वसुली कामी सरफेसी कायद्यांतर्गत कारखान्यास बेकायदेशीर जप्तीची नोटीस दिली होती. बेकायदेशीर जप्तीच्या विरोधात कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने डी.आर. टी. न्यायालय पुणे येथे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरती आज दि.०९.०२.२०२४ रोजी सुनावणी होऊन दिनांक १२.०२.२०२४ रोजी होऊ घातलेल्या जप्तीला मा.डी.आर.टी. न्यायालय, पुणे यांनी तुर्तास स्थगिती दिली. … Read more

वसंतदादांनी कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभसारखी दिशादर्शक-दिपक साळुंखे

वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक असून त्यांचा संघर्षमय वारसा कृतीतून पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपण केले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक साळुंखे- पाटील यांनी केले. ते वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे वसंतदादा काळे यांच्या जयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे … Read more

‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए व एमसीए सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एमबीए व एमसीए  सीईटी- २०२४ या दोन्ही  प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची … Read more

मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४:  ७१व्या मिस वर्ल्‍ड सोहळ्याच्या ग्रॅण्‍ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे भव्‍य सोहळ्यासह करण्‍यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्‍ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्‍या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्‍यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्‍यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार … Read more

सुसज्ज कार्यालयात नागरिकांना सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

                                             पंढरपूर, दि. 09 :- सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय ही चांगली  व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सुसज्ज कार्यालयात सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी केले.                   सार्वजनिक बांधकाम विभाग, … Read more

शेळवे येथे तालुका विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर:- (दि.23)- राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या जानेवारी २०२४ मधील किमान समान शिबीर कार्यक्रमातर्गंत तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर व अधिवक्ता संघ,पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सनराइज् पब्लिक स्कूल, शेळवे (ता.पंढरपूर) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली सनराइज् पब्लिक स्कूल, … Read more

पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी      “वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला हवा. आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करायला हवे, तसेच डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत” असे प्रतिपादन डिजिटल … Read more

लंडनच्या विश्व रिकॉर्डमध्ये झळकला महाराष्ट्राचा तरूण कलमकार

महाराष्ट्राच्या कलमवंत काव्यभूमीला अनेक दिग्गज लेखकांचा वारसा लाभला आहे ज्यामुळे मराठमोळ्या लेखकांची काव्यरचना सातासमुद्रापारही विराजमान आहे.अश्याच पावनभुमीतल्या महाराष्ट्राच्या निलेश पगारेने यंदाचे ०२ विश्व रिकॉर्ड्स त्याच्या नावी केले असून इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आणि लंडनचा हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्ड्‌सचा यात समावेश आहे.इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्लम टू वर्ल्ड डेमोंसट्रेशन : प्रोफेटीक वर्डस्मिथ हे टायटल आणि … Read more

सोन्याच्या दरांत घसरण; ही आहेत कारणे: एंजेल ब्रोकिंग

१८ जून ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर २.६ टक्क्यांनी कमी झाले आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ते २.३ टक्क्यांनी घटले. कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर घटकांमुळे पिवळ्या धातूचे दर मागील आठवड्यात घसरले … Read more

आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पंढरपूर- नुकत्याच तामिळनाडू मध्ये झालेल्या ‘व्हर्च्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ऍडव्हान्समेंट इन आर्टस, सायन्स अँड ह्युमिनिटीज २०२१’ मध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील जवळपास ८३ विद्यार्थी आणि १८ प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.             कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वेरी कायमच अग्रेसर असते. तामिळनाडू येथील ‘असोसिएशन ऑफ ग्लोबल अकॅडेमिक अँड रिसर्च’ आणि ‘असोसिएशन ऑफ … Read more