श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यवाहीवर संचालक मंडळ व चेअरमन अभिजीत पाटील यांनी १ महिन्यासाठी स्थगिती मिळाली आहे.

मागील जुन्या संचालक मंडळाच्या काळातील ही सर्व थकीत कर्जाच्या वसुली कामी सरफेसी कायद्यांतर्गत कारखान्यास बेकायदेशीर जप्तीची नोटीस दिली होती. बेकायदेशीर जप्तीच्या विरोधात कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने डी.आर. टी. न्यायालय पुणे येथे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरती आज दि.०९.०२.२०२४ रोजी सुनावणी होऊन दिनांक १२.०२.२०२४ रोजी होऊ घातलेल्या जप्तीला मा.डी.आर.टी. न्यायालय, पुणे यांनी तुर्तास स्थगिती दिली. … Read more

वसंतदादांनी कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभसारखी दिशादर्शक-दिपक साळुंखे

वसंतदादांनी गाव खेड्यातील लोकांसाठी जिद्द व संघर्षातून निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी दीपस्तंभासारखी दिशादर्शक असून त्यांचा संघर्षमय वारसा कृतीतून पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपण केले पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक साळुंखे- पाटील यांनी केले. ते वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे वसंतदादा काळे यांच्या जयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे … Read more

‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए व एमसीए सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एमबीए व एमसीए  सीईटी- २०२४ या दोन्ही  प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची … Read more

सुसज्ज कार्यालयात नागरिकांना सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

                                             पंढरपूर, दि. 09 :- सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय ही चांगली  व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सुसज्ज कार्यालयात सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल.असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी केले.                   सार्वजनिक बांधकाम विभाग, … Read more

HPN चॅनेलचे संपादक नागनाथ सुतार ‘डिजिटल स्टार महागौरव’ पुरस्काराने सन्मानित 

nagnath sutar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागनाथ सुतार यांचा सन्मान पंढरपूर :- पुरस्कार म्हणजे कामाची पोचपावती आणि पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप. असाच एक मानाचा पुरस्कार नागनाथ सुतार यांना प्रदान करण्यात आला. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने डिजिटल महास्टार 2024 हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कोल्हापुरातील कणेरी … Read more

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन ‘विठ्ठल सहकारी’चे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बक्षीस वितरण समारंभात विठ्ठल … Read more

शेळवे येथे तालुका विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर:- (दि.23)- राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या जानेवारी २०२४ मधील किमान समान शिबीर कार्यक्रमातर्गंत तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर व अधिवक्ता संघ,पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सनराइज् पब्लिक स्कूल, शेळवे (ता.पंढरपूर) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली सनराइज् पब्लिक स्कूल, … Read more

पंढरपूर येथे डिजिटल मीडिया पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न

पंढरपूर- प्रतिनिधी दि- २० जानेवारी      “वृत्तपत्र पत्रकारिता व डिजिटल पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. हे दोन्ही माध्यमं समाज घडविण्याचे काम करतात. डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या सर्व डिजिटल पत्रकारांनी शिक्षणावर भर द्यायला हवा. आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून काम करायला हवे, तसेच डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत” असे प्रतिपादन डिजिटल … Read more

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी रणदिवे तर कार्याध्यक्षपदी घाडगे

पंढरपूर- श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी संतोष रणदिवे यांची तर दैनिक सकाळचे राजकुमार घाडगे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर निवडी करण्यात आल्या. श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली. यामध्ये संतोष रणदिवे एकमताने अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. रणदिवे हे सहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून पंढरपूर शहर … Read more

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तालुक्यात 9 दिवस मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर- प्रणव परिचारक

कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त पंढरपूर तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्येच रक्तदाब व मधुमेह तपासणी देखील होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान आरोग्य कार्ड व आधारकार्ड दुरूस्ती अभियान संपन्न होणार आहे. दि.27 ऑगस्ट रविवार भाळवणी पासून या शिबिराची सुरुवात होईल. … Read more