January 14, 2026

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश-राजा माने

Please follow and like us:
Pin Share

मुख्यमंत्री व अजितदादांना महाबळेश्वर, कोल्हापूर अधिवेशनात दिलेला शब्द पाळला.

पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्र्यांची घोषणा

एकनाथ शिंदें, देवेंद्र फडणवीस, अजितदादांचे आभार

मुंबई, पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केली आहे.संघटनेच्या भिलार-महाबळेश्वर ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला तसेच कनेरीमठ-कोल्हापूर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळल्यास बद्दल राज्यभरातील पत्रकारांत आनंद व्यक्त होत आहे.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत होते.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रकारांची बाजू मांडली.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!