May 16, 2025

कबुतर वरून ओंकार संजय गायकवाड या तरुणाला मारहाण

पंढरपूर शहरातील आंबेडकर नगर येथील ओंकार संजय गायकवाड या २३ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली आहे . पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, अॅपेक्स हॉस्पीटल सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल पंढरपुर यांचेकडील पेशंट नामे ऑकार संजय गायकवाड वय 23 वर्षे धंदा नोकरी रा. आंबेडकरनगर पंढरपुर यांची एमएलसी पोलीस ठाणेस प्राप्त झाल्याने सदरचा पेशंटचा जबाब दवाखाना इंन्ट्री अंमलदार पोहेकॉ पांढरे यांनी नोंदवुन सध्याचे प्रभारी अधिकारी मा. पोनि मुजावर सो यांनी ठाणे अंमलदार यांना गुन्हा दाखल करावा असा शेरा नोंदविल्याने इंट्री अंमलदार यांनी रिपोर्ट सादर केल्याने गुन्हा दाखल करित आहोत.

मी ओंकार संजय गायकवाड वय 23 वर्षे धंदा नोकरी रा. आंबेडकरनगर पंढरपुर मी वरील ठिकाणी माझी आई, वडील एक बहिण, एक भाऊ यांचेसह राहावयास असुन मी पंढरपुर नगरपालीका येथे आरोग्य विभागात डास फवारणीचे काम करतो. तसेच कबुतर पाळतो, त्यावरुन उपजिवीका करतो. मी कबुतर पाळतो त्यातील एक कबूतर उडुन आंबेडकरनगर मधील शाकिमुनी गोविंद सर्वगोड याचे कबुतरात जावुन मिळाला व तो त्याने त्याचे ओळखीचे व्यक्तीला विकला होता. त्यांची नावे मला माहित नाहीत.

दिनांक 18/08/2024 रोजी सायंकाळी 6.00 वा चे सुमारास माझेकडून निघुन गेलेला व शाकिमुनी सर्वगोड याने विकलेला कबुतर परत माझेकडे येवुन माझेकडे असलेल्या कबुतरात मिळाला व 6.30 वा चे सुमारास माझेकडे शाकिमुनी गोविंद सर्वगोड व त्याचा भाऊ कनिष्क गोविंद सर्वगोड दोघे रा. आंबेडकरनगर पंढरपुर हे आले व माझे

कबुतरात येवुन मिसळलेला कबुतर परत मला दे, मी ज्याला विकलेला आहे त्याला परत द्यायचा आहे तेव्हा मी त्यास सांगितले की, एकदा कबुतर कबुतरात मिसळला की ते परत द्यायचा नसतो हा नियम आहे. हे सुरवातीला असेच तुझ्याकडे गेले तेव्हा मी तुला मागितले नव्हते ते कबुतर माझेच आहे असे म्हणालो असता त्यावेळी कनिष्कने मला आईघाल्या तु कबुतर कसा परत देत नाही वगैरे मला शिवीगाळ करून मला तु खाली ये मादरचोद असे दोघांनी मिळुन मला खाली बोलावुन घेतले. त्यामुळे मी त्या दोघांना समजावुन सांगण्यासाठी मी घराचे स्लॅफरुन खाली आलो तेव्हा आमचे घरासमोरील आमचे भरीव फायबरचा खोऱ्याचा दांडा पडलेला उचलुन शाकिमुनी गोविंद सर्वगोड याने त्याचे हातात घेवुन माझ्या उजव्या डोक्याचे वर कपाळावर अचानक जोराने मारला, तेव्हा मी जोराने ओरडलो. तरीही कनिष्कने मला हाताने मारहाण केली. तेवढ्यात घरातुन माझी बहिण व वडील आले. तसेच शेजारील राहणारे काजल शेंबडे हे तिघे मिळुन भांडण सोडविणेसाठी आले व आमचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता शाकिमुणी सर्वगोड याने त्याचे हातातील फायबरचा खोऱ्याचा भरिव दांडा देथेच टाकुन ते दोघे तेथून पळुन गेले. त्यानतर मी भांडणात दुखापत झाल्याने तक्रार देणेसाठी पोलीस ठाणेस गेलो होतो. तेव्हा तेथील पोलीसांनी मला उपचार करुन येण्यासाठी मला चिठ्ठी दिली. मी सरकारी दवाखाना पंढरपुर येथे जावुन उपचार करून परत पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी गेलो असता तेथे परत मला त्रास होवु लागल्याने मी परत अॅपेक्स हॉस्पीटल पंढरपुर येथे जवळ असल्याने उपचारांसाठी आलो. तेथे माझेवर उपचार चालु आहेत व माझी प्रकृत्ती पुर्णपणे बरी आहे. तरी मला वरीलप्रमाणे कबुतर परत मागण्याच्या कारणावरुन मला मारहाण करुन शिवीगाळी करून हाताने व फायबरच्या भरीव खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन जखमी करणाऱ्या शाकिमुणी गोविंद सर्वगोड त्याच भाऊ कनिष्क गोविंद सर्वगोड दोघे रा. आंबेडकरनगर पंढरपुर यांचेविरुध्द तक्रार आहे. हा जबाब मी सांगितले प्रमाणे लिहीला असुन तो मला माझी बहिण आरती गायकवाड हिने वाचुन दाखविला