October 19, 2025

पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर- पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी अभिराज उबाळे यांच्या सह विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी, सचिवपदी आरएनओ चे प्रतिनिधी दत्तात्रय देशमुख, उपाध्यक्षपदी दैनिक ऐक्यचे श्याम दिवेकर, खजिनदारपदी दैनिक सकाळचे भारत नागणे यांची निवड देखील करण्यात आली.यावेळी मावळते अध्यक्ष संतोष रणदिवे, जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते, सुनील दिवाण, प्रशांत आराध्ये, अतुल बडवे, अभय जोशी, सत्यविजय मोहोळकर, महेश भंडारकवठेकर, मंदार लोहोकरे यांच्यासह सचिन कसबे, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, सुरज सरवदे, नितीन शिंदे, राजू मिसाळ, नागनाथ सुतार, दत्तात्रय खटवटे, राजकुमार घाडगे आदी उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share