पंढरपूर (प्रणया सुतार)
दिनांक 30 जुलै रोजी पंढरी नगरीत शिवशाही न्यूज नेटवर्कचा चौथा वर्धापन दिन आणि शिवशाही महारत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर उद्घाटक म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, शिरूर नगरपालिकेच्या नगरसेविका पाणीपुरवठा सभापती डॉक्टर सुनिता पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा मोरे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, शिक्षक नेते बापूसाहेब अडसूळ , मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप, आमदार अभिजीत पाटील यांचे बंधू आनंद पाटील, आमदार समाधान आवताडे यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई अवताडे, युवा नेते नितीन सरडे, योगशिक्षिका गौरी खिस्ते, शिवशाही न्यूज चे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी, कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विठ्ठलाचा गंध लावून आणि औक्षण करून मान्यवरांचे कार्यस्थळी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपादक सचिन कुलकर्णी आणि कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार केला.

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, शिवशाही न्यूज ची सुरुवात झाली असून परखड सत्य निरपेक्ष आणि संतुलित बातम्यांच्या बळावर शिवशाही न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. यामध्ये आमचे सर्व प्रतिनिधी दर्शक आणि वाचकांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दात संपादक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिवशाही न्यूजचा प्रवास सांगितला.
मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवशाही महारत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मा. मंगेश चिवटे यांना वैद्यकीय सेवा, मा. रणजीत यादव यांना सोशल मीडिया, मा. डॉ. सुनिता पोटे यांना आरोग्य सेवा, मा. पार्वती ताई आवताडे यांना आदर्श माता, मा. डॉ. भारत गायकवाड आणि मा. प्रा. डॉ. तानाजीराव माने यांना साहित्य, मा. वैशाली वाघमारे यांना शैक्षणिक, मा. धनाजी बापू देशमुख यांना कृषी सेवा, मा. ॲड. संदीप वाघ यांना समाज सेवा, मा. दशरथ वाघमोडे यांना पोलीस सेवा, मा. सविता मुळीक यांना कृषी सेवा, मा. डॉ. प्राजक्ता मेटकरी खरात यांना संशोधन, मा. ईश्वरप्रसाद रितापुरे, शिक्षण संशोधन, मा. विठ्ठल जिद्दीमणी यांना युवा उद्योजक, मा. संजय चौधरी यांना संरक्षण, आणि मा. सौ. सविता व रवि सोनार यांना आदर्श पती-पत्नी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सचिन कुलकर्णी हे शिवशाही न्यूज च्या माध्यमातून अतिशय प्रामाणिक आणि तळमळीने काम करत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील गुणवंत शोधून त्यांना पुरस्कार देत आहेत. आणि हा पुरस्कार सोहळा श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आणि माझ्या मतदारसंघात होत आहे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आजकाल वृत्तसंस्था चालवणे कठीण होत चालले आहे त्यामध्ये ग्रामीण भागात तर हे काम जास्तच किचकट होत असते. मात्र शिवशाही न्यूज या सर्व अडचणीवर मात करून मोठे काम उभा करत आहे. शिवशाही न्यूज च्या कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शक्तीचे उदाहरण देत आहेत. शिवशाही न्यूज नेटवर्क चांगले भविष्य असल्याचे दिसत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदाताई तिवारी यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात शिवशाही न्यूजचे कौतुक करून, शुभेच्छा दिल्या. तसेच एक बहारदार भारुड त्यांनी सादर केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ .प्रणिताताई भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य ऋतुजा मोरे, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप, पत्रकार राजकुमार शहापूरकर, शिक्षक नेते बापूसाहेब अडसूळ, प्रिया कोचिंग क्लासेसच्या अर्चना धांडोरे, प्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख, यांनी मनोगत व्यक्त करून शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

शिवशाही न्यूजचे विभागीय उपसंपादक फैजल पठाण, शुभम कोदे, आणि वैभव कुलकर्णी, यांनी कार्यक्रमाच्या नियोजना मोलाचे योगदान दिले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वविक्रम वीर कवी रवी सोनार, नागेश सुतार, राजकुमार शहापूरकर, महेश खिस्ते, तानाजी जाधव, अजित देशपांडे, सुशांत मोहिते, नामदेव लकडे,, दादासाहेब खरात, सुजित कुमार कांबळे, नागेश सिंगण, रेखाकिशोरी टाक, रोहिणी सोले, भक्ती दामोदरे, प्रज्ञा बारस्कर, शुभांगी दहिवाळ, बिपिन कुलकर्णी, प्रीती कुलकर्णी, शैलजा सासवडे, महेश कुलकर्णी, मोनिका कुलकर्णी, आदिती उत्पात, शिवाजीराव बागल, शिवरंजनी कुलकर्णी, शिवाजीराव वाघमारे, सुरभी कुलकर्णी, निषाद कुलकर्णी, यांनी विशेष परिश्रम घेतले.






More Stories
बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण,लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा
एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन व एनडीए अॅकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
राणा प्रताप ग्रुपचे ‘शिव गौरव पुरस्कार’ जाहीर; 24 फेब्रुवारीला पंढरपूरात वितरण समारंभ