May 28, 2025

चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो; राज ठाकरेंची शाखाध्यक्षांना भन्नाट ऑफर

पुणे: पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे. (Raj Thackeray’s meeting with party workers in pune)

नाशिकचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे काल पुण्यात आले. आज त्यांचा पुण्यातील दुसरा दिवस आहे. आज ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. कालही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मतदारसंघ निहाय माहिती घेतली. स्थानिक प्रश्न आणि पुण्यातील राजकीय वातावरण, जनतेचा कल याविषयीचीही माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुणे पालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून त्यांनी शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखाध्यक्षांनी जोमाने काम करावे यासाठीच राज यांनी ही ऑफर दिली आहे. तसेच पुण्यात संघटनात्मक बांधणी चांगली व्हावी, हा हेतूही या ऑफरमागे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज यांनी ही ऑफर दिल्याने मनसेत नवचैतन्य संचारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर असेल.