October 18, 2025

छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा

Please follow and like us:
Pin Share

अहमदनगर : वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजयकुमार बलदवा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असं भाष्य करत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक आणि कौटुंबिक बदनामी केल्याचा आरोप आहे. तसेच महिला अधिकाऱ्याचे पती आणि मुलीबद्दल फोनवर अश्लील आणि अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचाही दावा केला जात आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला जात होता.

दरम्यान, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 33 वर्षीय मिलिंद पांडुरंग राऊत (रा. साबळे लेआऊट, वर्धा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. छतावर उभी राहून मोबाईलमध्ये गाणे ऐकत असलेली तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी मिलिंद राऊतने तिचा विनयभंग केला होता.

Please follow and like us:
Pin Share