February 21, 2026

राणा प्रताप ग्रुपचे ‘शिव गौरव पुरस्कार’ जाहीर; 24 फेब्रुवारीला पंढरपूरात वितरण समारंभ

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर(दि.21) : राणा प्रताप ग्रुप, पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे ‘शिव गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी दिली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्कारांद्वारे युटोपियन शुगरचे चेअरमन श्री.उमेशराव परिचारक, ह.भ. प. माधव महाराज नामदास श्री.सुरेश पवार सर व श्री डॉ.विजयकुमार सरडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या घरगुती शिवजयंती स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच ‘शिव गौरव पुरस्कार’ वितरण समारंभ मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता योग भवन, एलआयसी ऑफिस पाठीमागे, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.राणा प्रताप ग्रुपच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी शहरात घरगुती पातळीवर शिवजयंती साजरी करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत विविध कुटुंबांनी शिवरायांच्या प्रतिमांची आकर्षक सजावट, ऐतिहासिक देखावे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते. त्याचे परीक्षण करून आता विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.गेल्या बारा वर्षांपासून राणा प्रताप ग्रुपकडून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, समाजातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येतो. यंदाचे पुरस्कार प्राप्त मान्यवर पुढीलप्रमाणे —साहित्य क्षेत्र : श्री. सुजितकुमार कांबळे (पंढरपूर)क्रीडा क्षेत्र : पै. भीमराव (आप्पा) माळीशिक्षण क्षेत्र : प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे (क.भा.पा. महाविद्यालय, पंढरपूर)समाजसेवा क्षेत्र : श्री. अवधूत घाटे (गोरक्षक, पंढरपूर)आरोग्य क्षेत्र : डॉ. संभाजी भोसले (पंढरपूर)आदर्श संस्था पुरस्कार : तेजज्ञान फाउंडेशन, पंढरपूरया कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी केले आहे. शिवरायांच्या विचारांचा जागर आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!