February 26, 2026

स्वेरी अभियांत्रिकी व एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, मुंबई यांच्या संयुक्त डिझाईन पेटंटची नोंदणी

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर: स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर व वैद्यकीय जैवतंत्रज्ञान विभाग, एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, कामोठे, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या बायोमोल सेपरेटर (इलेक्ट्रोफोरेसीस) च्या डिझाईनच्या पेटंट ची नुकतीच नोंदणी करण्यात आली आहे.’ अशी महिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
सन २०१६ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर व वैद्यकीय जैवतंत्रज्ञान विभाग, एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, कामोठे, नवी मुंबई यांच्या सहयोगी कार्यातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. २०१६ साली झालेल्या पहिल्या ‘टेक्नो-सोसायटल’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेसचे सदस्य सहभागी झाले होते. या प्रकल्पाच्या यशामागील प्रेरक शक्ती म्हणजे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के. सुरी हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून ‘पोर्टेबल लो कॉस्ट कस्टम बिल्ट बायोमोलसेपरेटर (इलेक्ट्रोफोरेसीस) सिस्टीम’ विकसित करण्यासाठी हा सहयोगी प्रकल्प सुरू करण्यात आला. आज या प्रकल्पाच्या ‘डिझाईन पेटंट’ ची नोंदणी मंजूर करण्यात आली आहे. या प्रोटोटाइपची संकल्पना आणि बनावटीसाठी डॉ.व्ही.के.सुरी, डॉ.मानसी ठाकूर आणि स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पाटील हे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरला वेळोवेळी भेटी देऊन या प्रकल्पावर कार्य करत होते. मे २०१९ मध्ये त्यांनी या प्रोटोटाइपच्या विकासासाठी व हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्य केले. पुढे या विकसित केलेल्या प्रोटोटाइपची चाचणी एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, कामोठे येथे झाली. स्वेरी आणि एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस या दोन्ही संस्थांच्या परस्पर संमतीनंतर संयुक्तपणे या डिझाइन पेटंटच्या नोंदणीचा अर्ज दाखल करण्यात आला. शेवटी १२ जून २०१९ च्या प्राथमिक तारखेसह जुलै २०२१ मध्ये दोन्ही संस्थाना हे डिझाईन पेटंट मंजूर करण्यात आले. या पेटंटच्या प्रमाणपत्रावर डिझाईन अँड ट्रेड मार्क्सचे जनरल ऑफ पेटंट च्या नियंत्रकांची स्वाक्षरी आहे. स्वेरीचे हे रजिस्टर झालेले पहिलेच पेटंट असून यापूर्वी स्वेरीने एकूण १३ पेटंट्स फाईल केलेले आहेत. स्वेरीने सुरुवातीपासून संशोधनात प्रचंड मोठी झेप घेतली आहे. ‘टेक्नो-सोसायटल’ च्या माध्यमातून स्वेरीने आजपर्यंत सुमारे ६०० पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स प्रसिध्द केलेले असून त्यांना नुकताच ‘स्कोपस’चा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. विविध संशोधनासाठी स्वेरीला विविध संस्थांकडून आजपर्यंत जवळपास रु. आठ कोटीपर्यंत संशोधन निधी प्राप्त झाला असून त्यातून संशोधनाची अनेक कामे वेगाने सुरू आहेत. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या सहकार्याने हे पेटंट रजिस्टर केले गेले आहे. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, स्वेरीचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इनचार्ज, संस्थेअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांचे अभिनंदन केले.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!