August 26, 2025

सोलापूर सहोदय कॉम्प्लेक्स स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूरच्या विद्यार्थ्यांचे यश

कोर्टी, पंढरपूर: सीबीएसई बोर्ड, दिल्ली अंतर्गत चालणार्यात सोलापूर जिल्हयामधील सर्व शाळासाठी आयोजित केलेल्या ‘सहोदय कॉम्प्लेक्स’ या जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी ता. पंढरपूर येथील विद्यार्थांनी यश संपादन केले आहे. सदर स्पर्धा ऑनलाइन घेतली असून स्पर्धेमध्ये दहा शाळेतील  विद्यार्थां सहभागी झाले होते. या “बातमी वाचन” स्पर्धेमध्ये सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांनी दोन्ही गटामध्ये यश  मिळवले असून पहिल्या गटात सांची वोहरा हिने प्रथम क्रमांक मिळवला व दुसर्यात गटात पूर्वा रोंगे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच गायन स्पर्धेत सृष्टी बडवे प्रथम क्रमांक व स्टोरी टेलिंग स्पर्धेत देवांशी शर्मा चा प्रथम क्रमांक मिळाला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सिंहगड शाळेतील सर्व शिक्षक , कर्मचारी , यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले. शाळेने यावर्षीही विविध स्पर्धेतून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तरी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या स्कूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबिवले जात असतात. त्यामुळे हे यश मिळाले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले व मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर यांनी संगितले.