March 4, 2026

राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाकडून स्वेरीच्या संशोधन प्रकल्पांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर- ‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन स्कीम अंतर्गत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘टु आयडेंटीफाय द हजार्डस अँड कंटामिनेशन ड्यु टु फ्रिक्वेंटली युझड फंगीसाइड / पेस्टीसाइड: सजेस्टींग रेमिडीअल प्रॅक्टीसेस टु मिनीमाईझ कंटामिनेशन’ या विषयावरील स्वेरीच्या संशोधन प्रकल्पाला दोन लाख पन्नास हजार रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याची माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्र.प्राचार्य  डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.

         पंढरपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित बी.फार्मसी तथा कॉलेज ऑफ फार्मसीच्या संशोधन विभागामार्फत आणि संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ. मिथुन मणियार (मुख्य संशोधक), प्रा. रामदास नाईकनवरे व प्रा. स्नेहल चाकोरकर (सह संशोधक) यांनी ‘टु आयडेंटीफाय द हजार्डस अँड  कंटामिनेशन ड्यु टु फ्रिक्वेंटली युझड फंगीसाइड/ पेस्टीसाइड: सजेस्टींग रेमिडीअल प्रॅक्टीसेस टु मिनीमाईझ कंटामिनेशन’या विषयावर आपला संशोधन प्रस्ताव, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन स्कीम अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडे सादर केला होता. सदर प्रस्तावाला पिअर रिविव्ह कमिटी, सोलापूर विद्यापीठ कडून मान्यता मिळालेली आहे. तसेच या प्रकल्पाच्या संशोधन निधीबाबतचे पत्र व निधी महाविद्यालयास प्राप्त झालेले आहेत. प्र.प्राचार्य डॉ. मणियार यांचा संशोधन प्रकल्प हा शेती करताना नेहमी वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशक, कीटकनाशक या संदर्भातील आहे. सदर बुरशीनाशक व कीटकनाशकांच्या उपयोगामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचा या संशोधनामध्ये अभ्यास करण्यात येणार असून त्यावर उपाय शोधले जाणार आहेत. या संशोधनात वेगवेगळ्या मशीन्स व फवारणीच्या विविध पध्दती विकसित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. अशा योजनांतर्गत निधी मिळविणारे सोलापूर विद्यापीठतील महाविद्यालयांपैकी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय एकमेव आहे. संशोधन निधी बाबतच्या या यशाबद्दल प्र.प्राचार्य डॉ. मणियार, प्रा. नाईकनवरे व प्रा. चाकोरकर यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!