October 18, 2025

युवा नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा” चे बक्षीस वितरण

Please follow and like us:
Pin Share

ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख असणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३८व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून मुलांना खुलं व्यासपीठ न मिळाल्याने वक्तृत्व स्पर्धेत ६०पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यातील २२ स्पर्धकांनी यश प्राप्त केले. त्याचा यथोचित सन्मान धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिजीत पाटील म्हणाले की वाढदिवसाचं फक्त निमित्त असलं तरी आपल्या ग्रामीण भागातील मुला मुलींच्या कलेला वाव मिळावा हि संकल्पना माझ्या सहकाऱ्यांनी राबवली. वक्तृत्व ही सुंदर कला असून ती प्रत्येकांनी आत्मसात करायला हवी. जगातील अनेक क्रांत्या आणि अनेक महान व्यक्तिमत्त्व हे वक्तृत्वामुळेच घडले आहेत. सहकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं.

या स्पर्धात बाल गटात प्रथम सत्यम पवार, आहिल्या तळेकर, रूषिकेश तांदळे, संस्कृती गाजरे, विशालाक्षी कौलवार, तनिष्का सांळुखे खुला गटामध्ये, सुदर्शन लाटे, प्रफुल्ल माळी, रोहन कवडे, सना मुजावर, ऐश्वर्या नागटिळक, संस्कृती कोरे, भुमी झालटे, प्रिती कारंडे, तर मोठा गटामध्ये  साक्षी असबे, शिवध्वज गोडसे, शगुप्ता इनामदार, रेश्मा पवार, मोनाली पाटील, रूतूजा जगताप, सार्थक खेडकर, आर्या जगताप आशांना प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक व तृतीय पारितोषिक अशी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यास्पर्धेसाठी प्रा.तुकाराम मस्के, संतोष कांबळे, प्रा.महादेव तळेकर, समाधान गाजरे, अंकुश गाजरे, अजित लोकरे, नितीन पवार, इनामदार सर, आदमिलेसर,  किरण घोडके, अवधूत घाटे, समाधान भैय्या गाजरे, विशाल साळुंखे,विराज गायकवाड, संजय गवळी, शंकर सांळुखे तसेच अभिजीत आबा पाटील फाऊंडेशन या सर्व सहक-यांनी श्रम घेतल्याबद्दल पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Please follow and like us:
Pin Share