महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना, तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे वारे गावागावात वाहात असतानाच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपूर तालुक्यात देखील एक दमदार निवड केली आहे. शून्यातून विश्व साकारण्याचे स्वप्न उराशी बाळगून,अखंड वाटचाल करणारे, युवा उद्योजक दिपक बनसोडे यांची उद्योग आणि व्यापार विभागाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे राष्ट्रवादीत जोरदार स्वागत करण्यात आले आहे… तसेच सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर, खवणी येथील, माजी सरपंच तेजस बोबडे यांचीही निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नूतन पदाधिकारी यांचे,सोलापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी देखील दीपक बनसोडे आणि तेजस बोबडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोन्ही पदाधिकारी अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे, त्यांच्यावर दिलेली जबाबदारी, ते यशस्वीपणे हाताळतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षासाठीही त्यांचे योगदान महत्वाचे ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी व्यक्त केला आहे, यावेळी दीपक बनसोडे यांनी देखील आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व उद्योग व्यवसायातील व्यापारी वर्गाला येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी मोठ्या परिश्रमाने आणि विश्वासाने पार पाडले जाईल अशी ग्वाही देखील दीपक बनसोडे यांनी दिलीय, पंढरपूरच्या इसबावी कर्मवीर नगर येथील रहिवासी असलेले दीपक बनसोडे हे उच्चशिक्षित असून त्यांच्या पत्नी, डॉ. दिव्या बनसोडे हे देखील प्राध्यापिका आहेत, मुळातच दिपक बनसोडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत,आज यशस्वी उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं, एवढेच नाही तर न्यूज इंडिया लाईव्ह तर्फे देण्यात येणारा 2023 चा भारत बिजनेस अवार्डच्या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले, असे एक ना अनेक उद्योग क्षेत्रातील पुरस्कार पटकावले आहेत,2010 सालापासून आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून केले असून पक्षातील सर्वांशी त्यांचे स्नेहाचे संबंध असून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन संघटनेचे अध्यक्षपदी ही त्यांनी काम केले गेले आहे, याच अनुषंगाने विविध आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला असून आता नव्याने झालेल्या त्यांच्या निवडीचे जोरदार स्वागत करत कौतुकही करण्यात आले आहे, पंढरपूर तालुक्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे सदर ही निवड माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे व शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थिती बरोबरच संजय बाबा कोकाटे, सागर पडगळ, मयूर काळे ,सोलापूर जिल्ह्याचे उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा उद्योजक दिपक बनसोडे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योग आणि व्यापार विभागाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदावर निवड

More Stories
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे
डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी तानाजी जाधव यांची निवड