January 23, 2026

बार्शीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; विविध लोकहितकारी ठरावांना मंजुरी

Please follow and like us:
Pin Share

बार्शी (प्रतिनिधी): डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या बार्शी शाखेची नूतन कार्यकारिणी पदग्रहण बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ज्येष्ठ मार्गदर्शक सूर्यकांत वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या बार्शी तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे महत्त्वपूर्ण ठराव याप्रसंगी मंजूर करण्यात आले.

या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य दादा सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख धीरज शेळके, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी जिल्हा सहसचिव किरण माने, जिल्हा संघटक तानाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष नीता देव, महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीची निवड

बैठकीत बार्शी तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे:

  • अध्यक्ष: सिद्धार्थ बसवंत
  • उपाध्यक्ष: अक्षय बारंगुळे
  • ग्रामीण उपाध्यक्ष: भैरवनाथ चौधरी
  • सचिव: शंकर लाखे
  • खजिनदार: विश्वास वीर
  • संपर्कप्रमुख: श्रीशैल माळी
  • महिला तालुकाध्यक्ष: प्रतिज्ञा वाळके
  • कार्यकारी सदस्य: अभिजीत शिंदे, परशुराम राऊत, रवींद्र सांगोळे, स्वप्निल पोकळे, किशोर शेटे.

महत्त्वाचे मार्गदर्शन व ठराव

यावेळी राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना पत्रकारांनी कोणती काळजी घ्यावी आणि तांत्रिक अडचणी कशा सोडवाव्यात, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी व प्रवीण नागणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीत खालील ५ प्रमुख ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले:

  1. ४ फेब्रुवारी: संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या वाढदिवसानिमित्त व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त ५०० लिटर सुगंधी दूध वाटप करणे.
  2. राजकीय मागणी: संघटनेचे सर्वेसर्वा राजा माने यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.
  3. १९ मार्च: संघटनेचा वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करणे.
  4. पुरस्कार वितरण: वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील ७ उल्लेखनीय व्यक्ती/संस्थांचा गौरव करणे.
  5. शैक्षणिक मदत: जून महिन्यात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कार करणे.

या बैठकीस जिल्हा सहसचिव किरण माने, तानाजी जाधव, नीता देव, राजश्री गवळी यांच्यासह बार्शी शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!