January 4, 2026

झुंजार न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या संपादिका कु. सोनाली माने यांची भारतीय पत्रकार संघात सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

Please follow and like us:
Pin Share

माण तालुक्यातील बिदाल गावची सुकन्या आणि झुंजार न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या संपादिका कु. सोनाली कमल एकनाथ माने यांची भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलला भक्कम उभारणी दिली आहे. सध्या त्यांच्या चॅनेलमध्ये तब्बल १६ सदस्य कार्यरत असून, सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून ही जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. या निवडीबद्दल कु. माने यांचा दहिवडी येथे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, समाजसेवक विरभद्र कावडे, वडूज पोलीस अंमलदार तानाजी चंदनशिवे, जयराम शिंदे, राजकुमार डोंबे, कार्यकारी संपादक ओंकार माने, उपसंपादक आबासो शिंदे, तसेच झुंजार न्यूज महाराष्ट्रचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
पत्रकारिता क्षेत्रात नवनवीन विषयांवर धाडसी पद्धतीने बातम्या सादर करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य कु. सोनाली माने करत आहेत. तरुण पत्रकारांसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून, महिला पत्रकार म्हणून ग्रामीण भागात त्यांनी घडविलेली वाट ही अनेकांसाठी आदर्श ठरली आहे. आगामी काळात त्या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि ग्रामीण पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!