October 20, 2025

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे

Please follow and like us:
Pin Share

कार्याध्यक्षपदी विकास कस्तुरे तर सरचिटणीसपदी अकबर बागवान

सोलापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली आहे.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, राज्य कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी, डॉ. रवींद्र चिंचोळकर, जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख संजय पवार उपस्थित होते.कार्याध्यक्षपदी मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे, सचिवपदी सोलापूर डीएनएचे इम्रान सगरी, खजिनदारपदी वृत्तदर्पणचे सचिन जाधव, उपाध्यक्षपदी सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगीपेठकर आणि प्राईम महाराष्ट्र चॅनलचे संपादक शाहनवाज शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी जनक्रांती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे.पदाधिकारी निवडीनंतर कोकणातील सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. ‘डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व संपादक, पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. डिजिटल मीडियात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शासन दरबारी अडचणी मांडून त्या सोडवण्यात ही आम्हाला यश येत आहे. लवकरच सावंतवाडी या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांचे अधिवेशन होणार आहे.’ असे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.या बैठकीला जहूर सय्यद (लोकप्रधान), मधुकर मडूर (सत्य दर्शन), इरफान पटेल (राजकारण), साकिब शेख (सोलापूर सवेरा), सिद्धेश्वर गुरुदेहळळी‌ (कर्तव्यदक्ष), सत्यनारायण गड्डम (स्वरांजली), चंदन बोल्लू (बी न्यूज), इक्बाल शेख, रमजान मुलाणी (शिवराज्यपत्र), गौस शेख (हॅलो बळीराजा), अमित कांबळे (महाराष्ट्र लोकराज्य), फयाज शेख (राजनीती), राजाराम मस्के (तरुण भारत न्यूज), विश्वजीत सरवदे (महाराष्ट्र लोकराज्य), समीर आबादीराजे (सोलापूर की जनता), मनोजकुमार भालेराव, शरणू हजारे ‌(महाराष्ट्र लोकराज्य), दत्तात्रय केरे (राजनीती), अशोक कांबळे (मॅक्स महाराष्ट्र), यासीन शेख (सोलापूर व्हायरल) आदी उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share