कार्तिकी एकादशी सोहळ्या निमित्त मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात. भाविकांना स्वच्छ पिण्याचे, पाणी सुलभ शौचालय, मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध ठेवावा. तसेच वारकरी भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील पाणी पातळी नियंत्रित राहील याची दक्षता घ्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनाने वाळवंटात तात्पुरते शौचालय, स्वच्छता, प्रखर प्रकाशव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.तसेच चंद्रभागा वाळवंट कायमस्वरूपी स्वच्छ राहील याबाबत शासन स्तरावर नियोजन करण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, यात्रा कालावधीत दर्शन रांगेत पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. वीज वितरण कंपनीने अखंडित वीजपुरवठा करावा, शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवावेत. गर्दी नियंत्रणासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करावा. आवश्यक ठिकाणी माहिती फलक लावावे, बस स्थानकात स्वच्छता ठेवावी अशा सूचना मांडल्या तर आमदार अभिजीत पाटील यांनी कार्तिकी यात्रा कालावधी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध. ठेवाव्यात. शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवावेत. अन्न औषध प्रशासनाने कारवाई बरोबरच स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात असे यावेळी सांगितले.
यावेळी ह.भ.प. जळगावकर महाराज व ह.भ.प राणा महाराज वासकर यांनी प्रदक्षिणा मार्गावर कचकडी नसावी, चंद्रभागा वाळवंट स्वच्छ राहावे तसेच कार्तिक वारी झाल्यानंतर दिंड्या आळंदीकडे जात असतात. यावेळी दिंड्यांना सर्व आवश्यक सुविधा व सुरक्षा उपलब्ध व्हाव्यात. प्रदक्षिणा मार्गावर दिंड्यामध्ये स्पीकर चा वापर केला जातो तो वापर होऊ नये अशी मागणी यावेळी केली.






More Stories
पुण्यातील वाहन निर्मिती प्लांटचा विस्तार करण्यासाठी हार्मन ची रु. ३४५ कोटींची गुंतवणूक
युटोपियन शुगर्सचे मोळी पुजन उत्साहात संपन्न
सोलापुरात रक्तघटकाचा प्रचंड तुटवडा रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून आवाहन