October 29, 2025

युटोपियन शुगर्सचे मोळी पुजन उत्साहात संपन्न

Please follow and like us:
Pin Share

कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या 2025-2026 या बाराव्या गळीत हंगामाचा मोळी पुजन समारंभ शुक्रवार दि.24/10/2025 रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.

      यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याचा हा बारावा गळीत हंगाम आहे. चालू गळीत हंगामात 6.00 लाख मे.टन पेक्षा जास्तीचे गाळप करु. शासनाने दिनांक 01 नोव्हेंबर, 2025 पासुन गाळप परवाना दिलेला आहे. त्यामुळे चांगल्या रिकव्हरीचा ऊस मिळेल. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून गत अकराही हंगामात ऊस उत्पादक हे युटोपियन कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात व यापुढे हे देतील अशी खात्री आहे.

      या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व मोहोळ या तालुक्यातील कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी 10 हार्वेस्टर मशिन घेतलेल्या आहेत तसेच 250 ट्रॅक्टर, 150 मिनी ट्रॅक्टर याप्रमाणे करार केले आहेत.

      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की, संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. पहिल्या दिवसापासुन कारखाना पुर्ण क्षमतेने चालवला जाईल. सर्व कामगार वर्ग मिळुन हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतुक ठेकेदार, खातेप्रमुख व कामगार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी केले. व आभार मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी मानले.

Please follow and like us:
Pin Share