October 29, 2025

कलर कोटेड बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी जेएसडब्ल्यू स्टील आणि अमरावती पोलिसांचे संयुक्त छापे; ५० हून अधिक बनावट जेएसडब्ल्यू पत्रे जप्त

Please follow and like us:
Pin Share

● महाराष्ट्रात अमरावतीमध्ये ब्रँड गैरवापराच्या अनेक तक्रारींनंतर जेएसडब्लूच्या पथकाची कारवाई

● अमरावती शहर पोलीस ठाणे हद्दीतील रोलेक्स रूफिंग्ज आणि जीटी देवरिया येथे कंपनीकडून छापे

● कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अंतर्गत ९ आणि १२ ऑक्टोबर २०२५ ला एफआयआरची नोंद

● विक्रीसाठी ठेवलेले ५० हून अधिक कलर कोटेड बनावट पत्रे कारवाईदरम्यान जप्त

● ब्रँड उल्लंघन आणि बनावट उत्पादने रोखण्यासाठी अजिबात दयामाया न दाखविण्याच्या धोरणाचा जेएसडब्ल्यूस्टीलकडून पुनरुच्चार

नागपूर, ऑक्टोबर २०२५: जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने महाराष्ट्रात अमरावती येथे कंपनीच्या बौद्धिक संपदा हक्काचा संपत्तीचा गैरवापर करणाऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बनावट कंपन्यांविरुद्ध जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने ही निर्णायक कारवाई करताना जेएसडब्ल्यूच्या ब्रॅण्डचा गैरवापर करत बनावट उत्पादने विकण्याचा प्रकार रोखला आहे. जेएसडब्ल्यू ब्रँडचा वापर करत हुबेहुब बनावट उत्पादन विक्री होत असल्याचा अनेक तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कंपनीच्या ब्रँड संरक्षण पथकाने अमरावती शहर पोलिसांच्या सहकार्याने अमरावती शहर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या रोलेक्स रूफिंग्ज आणि जीटी देवरिया या दोन विक्री केंद्रांवर छापे टाकत कंपनीच्या नावाने बनावट उत्पादने विक्रीचा प्रकार उघडकीस आणला. कंपनीच्या पथकाने ९ ऑक्टोबर २०२५ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत, जेएसडब्ल्यू ब्रॅण्डचा नावाचा वापर करत कलर कोटेड केलेले आणि विक्रीसाठी ठेवलेले ५० हून अधिक बनावट पत्रे जप्त केले. कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अंतर्गत संबंधितांविरुध्द एफआयआर क्रमांक ०३५९/२०२५ आणि ०८६१/२०२५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंपनीच्या नावाचा गैरवापर करत अशा फसव्या आणि बनावट उत्पादनांच्या विक्रीत सहभागी असलेल्या व्यापारी आस्थापनांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाईबाबत जेएसडब्ल्यू स्टीलची कठोर वचनबद्धता या कारवाईमुळे पुन्हा एकदा दिसून आली आहे.*या कारवाईबद्दल भाष्य करताना जेएसडब्ल्यू स्टीलच्या प्रवक्ता म्हणाला:* “जेएसडब्ल्यू स्टीलच्या बौद्धिक संपत्तीचे उल्लंघन किंवा ब्रँडचा गैरवापर करण्यांना कंपनी अजिबात दयामाया दाखविणार नाही. बनावट उत्पादनांमुळे केवळ ग्राहकांची फसवणूकच होत नाही, तर कंपनीच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेसंदर्भातील उच्च मानकांशी देखील तडजोड होते. त्यामुळे जेएसडब्ल्यूच्या ब्रँडबाबत ग्राहकांचा असलेला विश्वास आणि भरोसा सदैव जपण्यासाठी आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून कारवाई करत राहू.”शासकीय यंत्रणांच्या साथीने जेएसडब्लू स्टीलने देशात विविध प्रदेशांमध्ये अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. अशा कारवाईंमध्ये आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे अलिकडेच टाकलेल्या छाप्याचा समावेश आहे. तेथे कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवाप करुन विक्रीस असलेली बनावट जेएसडब्लू सिल्व्हर ही उत्पादने जप्त करण्यात आली होती. जेएसडब्लूच्या नावाचा गैरवापर करत विकल्या जाणाऱ्या निकृष्ट आणि बनावट वस्तूंपासून ग्राहक, डीलर्स आणि वितरकांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीचा सक्रिय दृष्टिकोन या सातत्यपूर्ण प्रयत्नातून प्रतिबिंबित होतो.*आपल्या बौद्धिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आणि भारतातील आपल्या अधिकृत नेटवर्कद्वारे केवळ अस्सल, उच्च दर्जाची जेएसडब्ल्यू उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याबाबत जेएसडब्ल्यू स्टील वचनबद्ध आहे.

Please follow and like us:
Pin Share