October 19, 2025

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर-नुकतीच सांगली व कोल्हापूर या भागाला महापुराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत त्या पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत पंढरपूर शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. ती मदत आज पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर व आपला एक महिन्याचा पगार देणारे पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांनी  या मान्यवरांच्याहस्ते साहित्याचे पूजन करून सदरची गाडी सांगली कोल्हापूरकडे रवाना करण्यात आली.यावेळी मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे, पश्चिम महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष अरूणभाऊ कोळी, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष संदिप मांडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सुर्यकांत दाजी बागल, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, रणजित बागल, पंढरपूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक महम्मद उस्ताद, धनाजीआबा पाटील, संतोष बंडगर, दादा थिटे, सुरज पावले, विनायक संगीतराव, गणेश परचंडे, युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर, प्रशांत मलपे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रणव गायकवाड, शिवसेनेचे तानाजी मोरे, सचिन आटकळे, शहाजहान शेख, नानासाहेब चव्हाण, नवनाथ मोहिते, बाहुबली साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांनी दिली मदतबी.पी.रोंगे सर, उमेश सासवडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष सुळे, स्वागतदादा कदम, महम्मद उस्ताद, गणेश परचंडे, राजू शिंदे, डॉ.भायगुडे, प्रशांत खलिपे, मंगळवेढा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संदिप बुरकुल, अरूणभाऊ कोळी या व काही दानशूर व्यक्तींनी नांव न सांगण्याच्या अटीवर पुरग्रस्तांना  मोठी मदत केलेली आहे.

Please follow and like us:
Pin Share