पंढरपूर- श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी संतोष रणदिवे यांची तर दैनिक सकाळचे राजकुमार घाडगे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर निवडी करण्यात आल्या. श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली. यामध्ये संतोष रणदिवे एकमताने अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. रणदिवे हे सहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडले आहेत.यावेळी उपाध्यक्षपदी आरएनओ वृत्तसंस्थेचे दत्तात्रय देशमुख व प्रेस फोटोग्राफर आणि झी मिडियाचे कॅमेरामन राजू मिसाळ तर सचिव पदी दैनिक पंढरी संचार चे दत्तात्रय खटवटे यांच्या निवडी करण्यात आल्या. यासह कार्यकारी सदस्य पदी मंदार लोहकरे, सचिन कसबे, विनायक हरिदास, सुरज सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अभय जोशी, महेश खिस्ते, सत्यविजय मोहोळकर, प्रशांत आराध्ये ,अतुल बडवे, सुनील दिवाण, अभिराज उबाळे, भारत नागणे, नितीन शिंदे, संतोष कुलकर्णी, श्याम दिवेकर, नागनाथ सुतार, महेश भंडारकवठेर , संकेत कुलकर्णी, सचिन झाडे उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी रणदिवे तर कार्याध्यक्षपदी घाडगे

More Stories
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी परशुराम कोकणे
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी तानाजी जाधव यांची निवड
पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे