September 16, 2026

लंडनच्या विश्व रिकॉर्डमध्ये झळकला महाराष्ट्राचा तरूण कलमकार

Please follow and like us:
Pin Share

महाराष्ट्राच्या कलमवंत काव्यभूमीला अनेक दिग्गज लेखकांचा वारसा लाभला आहे ज्यामुळे मराठमोळ्या लेखकांची काव्यरचना सातासमुद्रापारही विराजमान आहे.अश्याच पावनभुमीतल्या महाराष्ट्राच्या निलेश पगारेने यंदाचे ०२ विश्व रिकॉर्ड्स त्याच्या नावी केले असून इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड आणि लंडनचा हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्ड्‌सचा यात समावेश आहे.इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये स्लम टू वर्ल्ड डेमोंसट्रेशन : प्रोफेटीक वर्डस्मिथ हे टायटल आणि हार्वर्ड वर्ल्ड रिकॉर्डमध्ये बिईंग वर्ड अँम्ब्लीशअर अँड प्रोफेटीक ऑथर : असे शीर्षक निलेश पगारेंना प्रदान करून गौरविण्यात आले आहे.


साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि खलनायकाच्या भुमिका गाजवणारे गोविंद नामदेव यांचाही २०२३ च्या विश्वरिकॉर्ड्स यादीत समावेश आहे.निलेश पगारे मुळं जालन्याचे असून ते कन्हैयानगर झोपडपट्टी भागातले असल्याचे समजते.उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वस्तरातूंन त्यांचे कौतूक आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Please follow and like us:
Pin Share

You may have missed

URL has been copied successfully!