May 14, 2025

कृष्णा पिसे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2024 या पुरस्काराने गौरव

टायकॉन ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे राज्यभरातून विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरकोली गावचे सुपुत्र कृष्णा पिसे यांना यावर्षीचा आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2024 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खूप कमी वेळेमध्ये यशाची शिखरे गाठलेल्या आणि आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या उद्योजकांचा सन्मान प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरकोली येथे असलेल्या शिवरत्न मार्ट या सुपर मार्केटला सोलापूर जिल्ह्यातील नामवंत सुपर मार्केट म्हणून नामांकन मिळाले आणि सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे सयाजी पॅलेस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडला. कृष्णा पिसे यांना टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे..