May 14, 2025

सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट

पंढरपूर,दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना कामकाजाबाबतची माहिती दिली.

यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सचिव श्री. पांढरपट्टे यांचा सन्मान विठ्ठलाची मूर्ती, शाल देऊन उपसंचालक श्री. पाटील यांनी केला. यावेळी माहिती सहायक एकनाथ पोवार, धोंडिराम अर्जुन, संदीप राठोड, अविनाश गरगडे यांच्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सचिव श्री. पांढरपट्टे यांनी कोरोना काळात अहोरात्र जागून केलेल्या कामाबद्दल माहिती सहायक, कॅमेरामन, छायाचित्रकार, वाहनचालक, शिपाई यांचे कौतुक केले. वाहनचालक, शिपाई यांनी स्वत:चे काम सांभाळून कॅमेरामन आणि छायाचित्रकार म्हणून काम केल्याचे पाहून श्री. पांढरपट्टे यांनी सर्वांचे तुळशीचे रोप देऊन सन्मान केला.