January 16, 2026

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

Please follow and like us:
Pin Share

प्रतिनिधी ..ईश्वर वठार
आज ईश्वर वठार येथे पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ स्मरणानिमित्त लोकनेते गोपीचंद पडळकर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने व ग्रामपंचायत ईश्वर वठार यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले सकाळी स्वर्गीय पंतांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नारायणराव देशमुख यांच्या उपस्थितीत माजी सरपंच नागनाथ हळणवर यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी ज्ञानराज भजनी मंडळ यांनी भजन कीर्तन फुले टाकण्याचा कार्यक्रम करून स्वर्गीय सुधाकर पंचांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन केले यानंतर उपसरपंच विजय मिटकरी यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्यांचे रेशन कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड ऑनलाइन करणे नवीन रेशन कार्ड काढणे आधार कार्ड दुरुस्ती करणे उत्पन्नाचे दाखले काढणे मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचे फार्म भरणे यांच्यासह विविध दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात आले हा कार्यक्रम लोकनेते गोपीचंद पडळकर फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर यांनी बोलताना सांगितले की स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक हे गोरगरीब वचित शोषित लोकासाठी काम करायचे म्हणून हा कार्यक्रम गावातील गोरगरिबांना पंढरपूरला न जाता जागेवरच सर्व दाखले मिळावेत त्यांची कामे लवकर व्हावीत याकरता हा कार्यक्रम राबवला आहे या कार्यक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला सुधाकरपंताना हीच खरी आदरांजली ठरेल असे सांगितले यावेळी तलाठी ग्रामसेवक महा-ई-सेवेचे कर्मचारी तहसील मधील पुरवठा विभागाचे कर्मचारी याचे सह गावातील ग्रामपंचायत सदस्य संत बाळुमामा आघाडीतिल पदाधिकाऱ्यांसह पंकज देवकते,ज्ञानेश्वर गुडंगे,भारत पांढरे, अर्जुन घोडके ,अजय देशमुख, अशोक तरंगे ,धनाजी देशमुख बापु बोरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Please follow and like us:
Pin Share
Copy link
URL has been copied successfully!