October 19, 2025

आषाढी यात्रेत पंढरपूर सह सहा जिल्ह्यात दोन कोटी भाविक सहभागी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Please follow and like us:
Pin Share

आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळावा, पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, सरपंच व कर्मचारी उपस्थित

पंढरपूर – वारकरी यांचे सेवेसाठी झटलेले कर्मचारी, पदाधिकारी व अधिकारी यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग व पंढरी नगरीत २ कोटी पेक्षा अधिक भाविकांचा प्रत्यक्ष सहभाग आहे असे मत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

पंढरपूर शहरात श्रीयश पॅलेस येथे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील शहरे, ग्रामपंचायती व पंढरपूर शहरातील वारकरी यांचे सेवा कार्य केले बद्दल कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या. अधयक्षस्थांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी आषाढी यात्रा यशस्वी केले बद्दल सोलापूर चे जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे सिईओ याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपायुक्त विकास मंजिरी कुलकर्णी, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, पुणे चे अतिरिक्त सिईओ चंद्रकांत वाघमारे, अहिल्यादेवी नगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सिईओ विजय मुळीक यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते सन्मान करणेत आला.या प्रसंगी पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे पंचायत अधिकारी, सरंपच, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तहसीलदार यांचा गौरव करणेत आला. जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख यांचा सन्मान

सातारा सिईओ याशनी नागराजन, पुणेचे सिईओ गजानन पाटील, सोलापूर चे प्रभारी जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करणेत आला. सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, यांचेसह उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, तत्कालीन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, यांचा सन्मान करणेत आला. विभागीय अधिकारी सचिन इथापे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार सचिन लंगोटे, , पोलिस अधिक्षक अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांचा सन्मान पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.

या प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम यांनी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भक्कम साथ व मार्गदर्शन केले मुळे कामे वेळेत करता आली. सातत्याने पाठपुरावा केलेमुळे जरामन हॅंगर, शौचालय सुविधाची कामे वेळेत करता आली. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी यात्रा यशस्वी करणे साठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सातत्यीने पाठपुरावा केला. सर्व यंत्रणा विश्वासात घेऊन मार्गदर्शन कळे. निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे यात्रा चांगली पार पडली.

वारकरी यांचे सेवा हेच माझे समाधान..!

सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सिईओ कुलदीप जंगम, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा आवर्जून उल्लेख करीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकारी यांचे पाठीवर कौतुकाची थाप टाकीत यांनी जर यंत्रणा कामाला लावली. नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली. २५ लाख लोक जरी पंढरी नगरीत आले असले तरी पालखी मार्गावर संताच्या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी दीड कोटी पेक्षा अधिक लोक आले. शासन यंत्रणेला या भाविकांचे नियोजन करावे लागले. निर्मल वारी यशस्वी केली. महास्वच्छता अभियानाचे स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे सर्व कर्मचारी , व्यापारी, पदाधिकारी व अधिकारी व कर्मचारी राबले. पालखी सोहळ्याचे विश्वस्त खुश झाले. सोहळ्यातील वारकरी यांचे मुख्यमंत्री वारकरी निवारा व्यवस्थेमुळे पालखी सोहळा प्रमुखांना देखील जर्मन हॅंगर सुविधा या पुढे पुरविणेत येणार आहे. व्हीआयपी दर्शन बंद होऊन पाच तासावर दर्शन बारी आली. रांगेतील भाविकांना अन्न चहा, नाश्ता या व्यवस्थेमुळे वारकरी यांचे चेहरा वरील समाधान हेच माझी सेवा असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगून भावविवश होऊन सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माझा गाव पातळीवरील सरपंच, सदस्य , पंचायत अधिकारी , आरोग्य सेवा , पाणी पुरवठा या सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांनी झटून काम केले. ११ हजार शौचालयामुळे निर्मल वारी झाल्याचा आनंद आहे. असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक करून केलेले कामा बद्दल शाबासकी दिली. यंत्रणेने मनावर घेतले तर चांगले काम होऊ शकते याचा प्रत्यय आला असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांचे हस्ते सन्मानाने भारवले स्वच्छतादूत..! पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम स्वच्छतादूत यांचा सन्मान केलेमुळे उपस्थित भारावून गेले. वाखरी मधील जितेंद्र पोरे या स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला. भारूडकार चंदाताई तिवाडी, गाडगेबाबा च्या वेषातील स्वच्छतादूत नागटिळक, कलाकार दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांचा सन्मान करणेत आला. दीड तास उपस्थितींना कलापथकाने मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमा साठी सहाय्यक गटविकास या कार्यक्रमासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळुंखे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शहाजहान तांबोळी, वरिष्ठ सहायक महेश वैद्य, संदीप अटकळे ,माउली साळुंखे, कनिष्ठ सहायक कमलेश खाडे, कनिष्ठ सहाय्यक कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

Please follow and like us:
Pin Share