मुंबईतील प्रसिद्ध व्यक्तींच्या फेसबुक अकाउंट वरून पैसे मागणार्या लोकांपासून सावधान…
कारण की मुंबईमध्ये एक अशी टोळी सक्रिय झाली आहे जी प्रसिद्ध लोकांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे जवळचे मित्र व त्यांच्या चाहत्यांकडून पैशाची मागणी करत आहेत.
कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 31 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले की त्यांच्या नावावर पहिला तर एक जाळी फेसबुक अकाउंट बनवले गेले त्यानंतर जवळच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली त्यानंतर नगरसेवकांत सोबत जेव्हा फेसबुक अकाऊंटवर त्यांचे मित्र जोडले गेले तेव्हा ह्याकारणे अपघात झाल्याचे सांगून आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायच्या बहाण्याने कमलेश यादव यांचा फोटो वापरून लोकांकडून तात्काळ मदत करण्यासाठी 20000 कोणाकडे दहा हजारांची मागणी केली.

जेव्हा अपघाता बाबत मित्रांना कळाले तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली तेव्हा कमलेश यादव त्यांनी सांगितले की मी ठीक असून मला काहीच झाले नाही आहे.
जेव्हा संपूर्ण प्रकार कमलेश यादव यांना कळाला तेव्हा त्यांनी त्यांचा फेसबुक अकाउंट बंद केले आणि भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी लोकांना सावध राहण्याचा इशारा केला आहे.
More Stories
एक्स्ट्राको इंडस्ट्रीजला अदानी समूह आणि एल अँड टी कंट्रक्शनकडून विशेष सन्मान; नवी मुंबई विमानतळाचे काम ठरले वेळेआधीच यशस्वी
जिल्हाधिकारी व सिईओ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच! उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प