October 20, 2025

शेळवे येथे तालुका विधी सेवा समितीचे कायदेविषयक शिबीर संपन्न

Please follow and like us:
Pin Share

पंढरपूर:- (दि.23)- राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या जानेवारी २०२४ मधील किमान समान शिबीर कार्यक्रमातर्गंत तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर व अधिवक्ता संघ,पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सनराइज् पब्लिक स्कूल, शेळवे (ता.पंढरपूर) येथे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली सनराइज् पब्लिक स्कूल, शेळवे (ता.पंढरपूर) येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्यायाधीश एन. एस. बुद्रुक, यांनी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींना शिक्षणाचा अधिकार, पोक्सो कायदा, तसेच रस्ता सुरक्षाबाबतचे ज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अधिवक्ता संघाचे सचिव ॲड. राहुल बोडके यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड व प्रस्ताविक अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी केले तर आभार अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड. शशिकांत घाडगे यांनी मानले.
सदर कार्यक्रमास अॅड. शिवराज पाटील, अॅड. संतोष नाईकनवरे , अॅड. राहुल भोसले, अॅड. सागर गायकवाड, शाळेचे संस्थापक श्री. समाधान गाजरे तसेच न्यायालयीन कर्मचारी. के.के.शेख, व्ही.एस. कणकी, व्ही. आर.चुंबळकर, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share