October 20, 2025

एक्स्ट्राको इंडस्ट्रीजला अदानी समूह आणि एल अँड टी कंट्रक्शनकडून विशेष सन्मान; नवी मुंबई विमानतळाचे काम ठरले वेळेआधीच यशस्वी

Please follow and like us:
Pin Share

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणी प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एक्स्ट्राको इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. आणि एक्स्ट्राको इंडस्ट्रीज एल.एल.सी. यूएई या कंपन्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. अदानी समूह आणि एल अँड टी कंट्रक्शन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित एका विशेष समारंभात या कंपन्यांच्या कार्याचे कौतुक केले.

एक्स्ट्राको इंडस्ट्रीजने निर्धारित वेळेआधीच १७ खास स्तंभांवर ४७०० अद्वितीय पॅनल यशस्वीरित्या बसवले. या स्तंभांची रचना कमळाच्या फुलासारखी असून ती सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या विशिष्ट रचनेमुळे विमानतळाच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अदानी समूह आणि एल अँड टी कंट्रक्शन कंपनीने एक्स्ट्राको इंडस्ट्रीजचे विशेष आभार मानून त्यांचा सत्कार केला.

या समारंभात अदानी समूहाचे श्री राकेश पाटील (डीजीएम), श्री धर्मेंद्र सिंग (जीएम), श्री पंकज शर्मा आणि चिंतन शुक्ला (डिझाईन हेड) उपस्थित होते. त्याचप्रमाणे, एल अँड टी कंट्रक्शन कंपनीचे श्री सुमन चंदा (व्हाइस प्रेसिडेंट), श्री नरेन गोबिंद्रनाथ (व्हाइस प्रेसिडेंट) आणि श्री राजेश पंचलोट (प्रोजेक्ट डायरेक्टर) यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. एक्स्ट्राको इंडस्ट्रीजकडून श्री हबीब अब्दुल वहाब खान (एमडी), श्री अकील करीमी (डायरेक्टर) आणि श्री अब्दुल रहमान वाजिद खान (प्रोजेक्ट डायरेक्टर) तसेच त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या यशाबद्दल सर्व उपस्थितांनी एक्स्ट्राको इंडस्ट्रीजचे अभिनंदन केले.

Please follow and like us:
Pin Share