October 19, 2025

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नाचे दिले उत्तर

Please follow and like us:
Pin Share

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे ह्या आज कोरोना मुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना गोऱ्हे यांनी धुळ्यातील जी गाव कोरोना मुक्त झाली आहेत, त्या गावतील नागरिकांच्या अँटीबॉडीज चेक करून त्यावरून तेथील नागरिकांनी डोस घेतले आहेत की नाही तसेच त्यांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीज वरून अंदाज घेत त्यांना पुन्हा येणाऱ्या लाटेत कोरोना होण्याच्या शक्यता असल्यास त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नसून मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे, यावर टीका करत मुख्यमंत्र्यांनी विना पंचनामा करता पूरग्रस्त भागात मदतीचे पॅकेज का दिले असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर नीलिमा गोरे यांनी उत्तर देताना सांगितले की, केंद्र सरकारचे गुजरात वर जास्त प्रेम आहे. गुजरात सरकारला न मागता 1 हजार कोटी रुपये दिले, मात्र महाराष्ट्र सरकार ला काहीच नाही. म्हणजे आपल ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट अशी सनसनीत टीका त्यांनी यावेळी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मदत करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा गुजरातमध्येच आपली कृपादृष्टी करणाऱ्या प्रधानमंत्री यांच्याकडून केंद्रामार्फत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असा टोला लगावला आहे.

Please follow and like us:
Pin Share